'आखिर राज की बात क्या है' ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

शिवतीर्थ निवासस्थानी भेट

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Uddhav Thackeray Raj Thackeray ठाकरे कुटुंबातील दोन भावंडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नात्यात पुन्हा एकदा जिव्हाळा वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या जिव्हाळ्याच्या साक्षीदार ठरलेल्या या काळात उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली आहे.
 
मुंबई, Uddhav Thackeray Raj Thackeray
 
राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर पोहचले. यामुळे Uddhav Thackeray Raj Thackeray दोघांच्या जवळीक चर्चांना नवीन उधाण आले आहे. गेल्या दिवाळीत मनसे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या प्रसंगी कित्येक वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र दिसले होते. त्यानंतरही दोघांच्या भेटी आणि कौटुंबिक कार्यक्रमांमुळे त्यांची जवळीक वाढत आहे.राज आणि उद्धव या दोघांनी हिंदी सक्तीविरोधात एकत्रितपणे आवाज उठवून राजकीय स्तरावरही सहकार्याची शक्यता निर्माण केली आहे. विजयी मेळाव्यातही ते एकाच व्यासपीठावर दिसले होते. शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंने मातोश्रीवर भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब गणपती दर्शनासाठीही राज ठाकरेंच्या घरी गेले होते.
 
 
या सगळ्या घटनांमुळे Uddhav Thackeray Raj Thackeray आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र, अद्याप या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही, कौटुंबिक नात्यांमुळे आणि राजकीय वातावरण पाहता, युती होण्याची शक्यता तगडी आहे.परंतु, या दरम्यान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे बंधूंबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वाद वाढले आहेत. भाई जगताप यांनी स्पष्ट केले की, "आम्ही राज ठाकरेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करणार नाही." त्यांनी सांगितले की, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीही हेच ठामपणे सांगितले होते. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील काही चर्चा रंगल्या आहेत.
 
 
यानंतर, भाई जगताप यांनी काँग्रेसच्या पॉलिटिकल वर्किंग कमिटीच्या बैठकीत सांगितले की, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांना लढण्याची संधी द्यावी. काँग्रेस मुंबईत स्वबळावरच लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे बंधूंच्या भेटी आणि कौटुंबिक सहवासामुळे आगामी निवडणुकीत युतीची शक्यता अधिक दृढ होत आहे, पण काँग्रेसने स्वबळावरच लढण्याच्या संकेतांमुळे महापालिका निवडणुकांचे रंग अधिकच उत्सुकतेने पाहायला मिळतील. ठाकरे बंधूंची एकत्रित वाटचाल कशी ठरते, हे पुढील काळातच स्पष्ट होईल.