तभा वृत्तसेवा
ढाणकी,
Ashish Pratapwar : आपला भारत हा संपत्तीच्या, ज्ञानाच्या बाबतीत समृद्ध होता एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता. मग ती समृद्धता आज का नाही, कारण आपल्या देशावर परकीय आक्रमण झाले. या आक्रमणात आपल्या देशाची समृद्धता लुटून नेली, त्यावेळी आपल्या देशात शूर वीर लोक नव्हती का, ती असताना आपली समृद्धता कशी लुटून नेली, याचं कारण आहे आपण आपल्या हिंदुत्वाला विसरलो म्हणून आपल्या देशावर अनेक संकट आली, असे प्रतिपादन आशिष प्रतापवार यांनी केले.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मणगाव शहराच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आपण बलवान झालो पाहिजे कारण ज्यांच्याजवळ बळ नाही अश्या समाजाला कोणीही विचारत नाही, ज्याच्याजवळ बळ आहे त्याला सर्व जग पूजत असते, बलहीनो को नही पूछता बलवानो को विश्व पूजता.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गजानन मुक्कावार व खंड कार्यवाह महारुद्र विष्णू बिबेकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातून भव्य गणवेषधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन ब्राह्मणगाव शहराच्या मुख्य मार्गाने निघाले होते. अनेक नागरिकांनी या पथसंचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ब्राह्मणगाव शहरात संघांचे पहिल्यांदा संचलन निघाल्याने अनेकांना नवल वाटले. अनेक तरुण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्राह्मणगाव मंडलाचे कार्यवाह प्रदीप धोबे यांनी प्रस्तावना व आभार व्यक्त केले. विशाल धबडगे, नीलेश बेन्द्रे, गणेश बेन्द्रे, पवन उद्धटवाड, ओंकार धोबे, साईनाथ ढोले, बालाजी वानखेडे, रामदास घोडेकर, बळीराम कुरूमवाड, अमोल गायकवाड, रोहण लंकलवाड, प्रशांत सावंत, विजय केशेवाड, प्रदीप कदम, पवन धबडगे, विवेक टेकाळे, शंकर टेकाळे, पांडुरंग शेटे, श्रीकांत पवार, सुमित कणकापुरे, गजानन खंदारे, राजू कणकापुरे, रुद्र स्वामी, धनंजय लंकलवाड, तरुण भारतचे दत्ता काळे इत्यादी स्वयंसेवकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.