मुंबई,
Chhagan Bhujbal admitted राज्याच्या राजकारणातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तब्येतीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात नेण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाकडून भुजबळ यांच्या आरोग्याची सखोल तपासणी केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीचा अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, मात्र डॉक्टरांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राज्यातील अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्री वर्गाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही नेत्यांनी रुग्णालयात भेट देण्यासाठी हालचाली सुरू केल्याचंही सूत्रांकडून समजते. भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसत होते. अचानक प्रकृती बिघडल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.