कारंजा (घा.),
Demand for cameras शहरात सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन स्थानिक नागरी समस्या संघर्ष समितीच्या वतीने कारंजा नगरपंचायतला देण्यात आले. नागरिकांची सुरक्षितता आणि चोर्यांचे वाढते प्रमाण या पृष्ठभूमीवर शहरात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे बसस्थानक, गोळीबार चौक, मुख्य मार्केट रोड, पंचायत समिती चौक, मॉडेल हायस्कूल पुढील परिसर व मॉडेल महाविद्यालयापुढील बोगदा, जयस्तंभ चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, सर्व शाळा, महाविद्यालय परिसर, मुख्य रस्ते व चौक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी समितीचे सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.