तभा वृत्तसेवा
ढाणकी,
dhanaki-elections-shiv-sena : शिवसेनेचे ढाणकी शहरप्रमुख संजय सल्लेवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी ढाणकी येथे शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. एरवी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपात लढत असायची. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळणार असल्याचे चित्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेससह अनेक पक्षांनी खोटी आश्वासने देऊन अनेक निवडणुका जिंकल्या. त्यामुळे मतदारांचा इतर पक्षांवरचा विश्वास उडालेला दिसून येत आहे.
ढाणकी शहर अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून या पाच वर्षांत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शहरात एक-एक महिना नळाला पाणी नाही, कचरागाडी फिरणे बंद झाली, नालेसफाईचे काम नाही, कधीकाळी नाल्या उपसल्या, परंतु उपसलेल्या नालीतील ढिगारे जसेच्या तसेच परत नालीत वाहून गेले.
पावसाळ्याच्या दिवसात अनेक घरांत पाणी शिरले, शहरात रस्त्याचे काम अपुरे राहिले, काही कामे झाली पण ती निकृष्ट दर्जाची करण्यात आली. मग एक ना अनेक समस्या असताना प्रबळ दावे करणारे मोठ-मोठे पक्ष यांच्या आश्वासनांचे झाले तरी काय, असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.
शहरात एवढ्या समस्या असताना कोणताच मोठा पक्ष काँग्रेस असो अथवा भाजपा जनतेच्या हितासाठी पुढे धजावला नाही. मात्र करवसुली सक्तीने करण्यात आली. मग पाच वर्षांत यांनी केले तरी काय, असा प्रश्न मतदार करीत आहेत.
जनतेचा कौल सध्यातरी शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये ‘इनकमिंग’चे सत्र सुरू असून अनेक पक्षांच्या बैठका सुरू असल्या तरी पक्षप्रवेश मात्र शिवसेनेमध्येच होत आहेत. म्हणून होणाèया नगर पंचायत निवडणुकीमध्ये एक संधी शिवसेनेला द्यावी, अशी चर्चा जनसामान्यांत सुरू आहे.
आता होणाèया नगर पंचायतच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्यातरी या निवडणुकीमध्ये शिवसेना बाजी मारेल अशी चर्चा चौकाचौकात रंगलेल्या दिसत आहेत.