नागपूर,
dr samir arbats आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. समीर अर्बट यांची वर्ल्ड असोसिएशन फॉर ब्रॉन्कॉलॉजी अँड इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजी (डब्ल्यूएबीआयपी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मीडिया समितीच्या जागतिक अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. डॉ. अर्बट हे नागपूरस्थित अग्रगण्य आंतरराष्ट्रीय फुफ्फुस रोग तज्ज्ञ असून, अॅडव्हान्स्ड ब्रॉन्कोस्कोपी आणि मिनिमली इनव्हेसिव्ह तंत्रज्ञानातील त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.
ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वक्ता म्हणून सहभागी होतात आणि श्वसनविज्ञान क्षेत्रातील त्यांच्या संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक स्तरावर ओळखले जातात. यंदा सण २०२४–२०२६ या कार्यकाळासाठी त्यांची सलग दुसऱ्या वेळेस निवड झाली असून, हा नागपूरसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. जपानस्थित डब्ल्यूएबीआयपी ही संस्था फुफ्फुस विज्ञान, ब्रॉन्कॉलॉजी आणि इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजी या क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि जागतिक सहयोग वाढविण्यासाठी कार्यरत आहे. जगभरातील ६४ देशांतील सुमारे ११ हजार तज्ज्ञ सदस्य या संघटनेशी संलग्न आहेत. मीडिया समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. अर्बट यांनी गेल्या कार्यकाळात जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजीविषयी शैक्षणिक माहिती आणि नव्या क्लिनिकल संशोधनांचा प्रसार करण्याचे काम केले.dr samir arbats त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने दरवर्षी पाच आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे १५० हून अधिक शैक्षणिक अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली, ज्यामुळे या क्षेत्रातील जागतिक जनजागृतीत मोठी वाढ झाली. जागतिक शिक्षण आणि प्रसार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना डब्ल्यूएबीआयपी वर्ल्ड काँग्रेस (बाली, २०२४) मध्ये राष्ट्रपती प्रशंसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आगामी डब्ल्यूएबीआयपी वर्ल्ड काँग्रेस २०२६ ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे होणार असून, त्यातही डॉ. अर्बट यांची प्रमुख भूमिका राहणार आहे.