अमरावती,
E-bus depot in Amravati केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस योजनेंतर्गत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनसाठी बडनेरा क्षेत्रातील शासकीय जागा मंजूर झाली असून महापालिकेने मूल्यरहित पद्धतीने ३० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत मंगळवारी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने या विषयासाठी पाठपुरावा केला होता, त्या प्रयत्नाला आता आले आहे. मंगळवारी महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला.
बडनेरा येथील सर्व्हे क्रमांक ११० मधील २.३८ हेक्टर शासकीय जमीन केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस योजनेंतर्गत ई-बस डेपो व चार्जिंग र्स्टेशनच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिते अंतर्गत व महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार काही अटी व शर्ती टाकून ३० वर्षासाठी विनामूल्य भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. यामुळे अमरावती शहराचा मोठा प्रश्न आता मार्गी लागला आहे. याबाबत आमदार रवी राणा यांचे अमरावती शहर व बडनेरा शहरातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले तर शासकीय अधिकार्यांमध्येही आनंद व्यक्त होत आहे.