ड्रेसिंग रूममध्ये गंभीरने रोहित-विराटला काय म्हटले? BCCIने व्हिडिओ केला जारी!

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
gambhir-rohit-virat शनिवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनुभवी जोडी — रोहित शर्मा आणि विराट कोहली — यांनी पुन्हा एकदा आपल्या क्लासिक शैलीत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १६८ धावांची अप्रतिम भागीदारी करत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. अलीकडेच त्यांच्या फॉर्म आणि स्थानाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांना या कामगिरीने ठाम उत्तर दिले.
 

gambhir-rohit-virat 
 
सामन्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना उद्देशून भाषण केले आणि काही महत्त्वाच्या टिप्पणी केल्या. गंभीरने सर्वप्रथम रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या ६९ धावांच्या सलामी भागीदारीचे कौतुक करत ती “विजयाची पायाभरणी” असल्याचे म्हटले. gambhir-rohit-virat त्यानंतर त्याने रोहित-कोहलीच्या १६८ धावांच्या नाबाद भागीदारीचे वर्णन “उत्कृष्ट आणि जबाबदारीपूर्ण” असे केले. गंभीर म्हणाला, “फलंदाजीच्या बाबतीत शुभमन आणि रोहित यांची भागीदारी खूप महत्त्वाची होती. आणि त्यानंतर रोहित आणि विराट यांनी अप्रतिम खेळ केला. रोहितचे शतक अफाट होते आणि सामना संपवणे ही मोठी गोष्ट आहे. विराटनेही संयम आणि वर्ग दाखवला.”
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत गंभीर म्हणताना दिसतो की, “दोघांनीही सामना संपवला हे संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. या सामन्याने दाखवून दिले की आपण लक्ष्याचा पाठलाग किती शिस्तबद्ध आणि क्लिनिकल पद्धतीने करू शकतो.” सामन्यानंतर रोहित शर्मा यांनीही मान्य केले की ही दोघांचीही ऑस्ट्रेलियातली शेवटची एकदिवसीय मालिका असू शकते, कारण दोघेही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरीस पोहोचत आहेत. gambhir-rohit-virat पुढील टप्प्यात त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होणार असून, संघ आता त्या मालिकेच्या तयारीकडे लक्ष केंद्रीत करत आहे. या मालिकेत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल रोहित शर्मा याला “मालिकावीर” (Player of the Series) म्हणून गौरविण्यात आले. तर पहिल्या दोन सामन्यांत सलग शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली ने तिसऱ्या सामन्यात केलेली दमदार खेळी त्याच्यासाठी आणि संघासाठी दोघांसाठीही दिलासादायक ठरली.