जिप निवडणूक; कोण असणार उमेदवार

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
विजय माहुरे
घोराड, 
Ghorad Z.P. Election आरक्षणाची सोडत झाली. दिवाळीही गेली. सोशल मीडियावर शुभेच्छांचे बॅनर झळकले. त्यातच पक्षाचे चिन्ह दिसू लागले अन् गावागावात चर्चेला उधाण आले उमेदवार कोण? कशी होणार लढत, यावर संभाव्य उमेदवारांबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सेलू तालुका राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या तालुयात जिपचे ६ क्षेत्र, पंचायत समितीच्या १२ गणांचा समावेश आहे. गत निवडणुकीत चार जागी भाजपा तर दोन जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. येणार्‍या निवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल, अशी चर्चा सुरू आहे. काही संभाव्य उमेदवार भेटीगाठी घेत असल्याने वातावरण तापू लागले आहे. भाजपा व काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुयातील दोन नेत्यांना जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, हे विशेष.
 
 
Ghorad Z.P. Election
 
सुकळी स्टेशन गटात काँग्रेसकडून जिपचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ लोणकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राणा रणनवरे, भाजपाचे जीवराज भावरकर, केळझरमध्ये भाजपाचे जिप माजी सदस्य विनोद लाखे, काँग्रेसचे फारुख शेख, हमदापूरमध्ये भाजपाचे जिप माजी सदस्य किशोर शेंडे व पळसगावचे माजी सरपंच धीरज लेंडे, काँग्रेसचे अतुल पन्नासे, बालेश मोरवाल, येळाकेळीमध्ये भाजपाचे अशोक कलोडे, काँग्रेसचे राजेश झाडे, हिंगणी गटात घोराडचे माजी सरपंच भाजपाच्या ज्योती घंगारे, सेलू पंस माजी सभापती अशोक मुडे यांच्या पत्नी हिंगणीच्या माजी सरपंच शुभांगी मुडे तर काँग्रेसकडून प्राजता ठाकरे, पल्लवी खोपडे यांच्या नावाची चर्चा राजकीय मंडळींकडून ऐकायला मिळत आहे.