तभा वृत्तसेवा
पुसद,
indranil-naik : गावोगावच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात दाखल होणाèया रुग्णांना सरकारी योजनेचा लाभ व्हावा, असे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे केले. येथील जाधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार निलय नाईक होते.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय देशमुख, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, डॉ. महमंद नदीम, दीपक आसेगावकर, डॉ. वीरेन पापळकर, डॉ. उमेश रेवणवार, महंत कबीर महाराज, डॉ. मनीष पाठक, डॉ. यादव सूर्यवंशी, गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण चव्हाण, माजी कार्यकारी अभियंता अनिल ओंकार, अॅड. आशिष देशमुख उपस्थित होते.
जाधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दयाराम जाधव, डॉ. ललित जाधव आणि डॉ. वीणा जाधव तसेच गुलाब जाधव व जुगल जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी खा. संजय देशमुख, डॉ. महंमद नदीम, डॉ. वीरेन पापळकर व डॉ. उमेश रेवणवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निलय नाईक यांनी जाधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची अद्ययावत उभारणी करून जाधव कुटुंबियांनी गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संचालन प्रा. रवी चापके यांनी केले, तर डॉ. ललित जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील असंख्य मान्यवर मंडळी व रुग्ण उपस्थित होते.