पहिल्या T20 मध्ये कोण खेळणार? संजू-कुलदीपला मिळेल का संधी?

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
IND vs AUS : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सध्या सुरू असून, एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-२० मालिकेची वेळ आली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात असून, पहिल्या सामन्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरेल याची उत्सुकता आहे.
 
SANJU
 
 
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आत्मविश्वासात आहे. ऑस्ट्रेलिया एक बलाढ्य संघ असल्याने ही मालिका अत्यंत रोमांचक ठरणार आहे. भारतीय संघासाठी आव्हानात्मक असलेल्या ऑस्ट्रेलियन पिचवर चांगली सुरुवात करण्यासाठी संघ सज्ज आहे.
 
संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मधल्या फळीत जबाबदारी सांभाळतील. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर असल्याने शिवम दुबेचा समावेश जवळजवळ निश्चित आहे. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यात निवड होईल.
 
स्पिन विभागात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात स्पर्धा आहे. वेगवान माऱ्यात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग मुख्य जबाबदारी पार पाडतील. अंतिम संघाची घोषणा सामना सुरू होण्याच्या आधी केली जाण्याची शक्यता आहे.
 
पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभाव्य अंतिम इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.