हदगाव,
kiran wankhede संभाजी ब्रिगेड या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या संघटन कार्यात सातत्याने योगदान देणारे किरण वानखेडे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कमलेश कदम (नांदेड उत्तर) यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
वानखेडे यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनात सक्रिय राहून समाजजागृती, युवक संघटन व विचार प्रसाराचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची व नेतृत्वगुणांची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी सांगितले. नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, ही नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राहणार असून, या काळातील कार्यक्षमता पाहून पुढील काळात कायम करण्यात येईल. संभाजी ब्रिगेडच्या आचारसंहितेचे पालन, चारित्र्यनिष्ठ आचरण, वाचन संस्कार व बंधूभाव जोपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.kiran wankhede जिल्हाध्यक्ष कमलेश कदम यांनी वानखेडे यांच्या कार्यास शुभेच्छा देत सांगितले की, महामानवांच्या विचारसरणीवर आधारित समतावादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी किरण वानखेडे यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल.