वर्धा,
Mahila Congress appeals महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने फलटन येथील डॉ. संपदा मुंडे यांचा बळी प्रकरणाचा २७ रोजी निषेध नोंदवित या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी स्वीकारले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा हेमलता मेघे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
महिला अन्याय, अत्याचाराचे असंख्य गुन्हे ताजे असताना दिवसागणिक या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. संपदा मुंडे यांचा बळी होय. या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत लढण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना अर्चना भोमले, सोनाली कोपुलवार, बबीता नेगी, प्रतिमा जाधव, शिला गुजर, शिला ढोबळे, सुवर्णा नगराळे, सोनू सुटे, रूपाली शिवरामवार, आशा भुजाडे, वर्षा मून, सोनिका जाधव, जयश्री कटारे, एलीस एका, संगीता वादाफळे, प्रणीता डंभारे, वैष्णवी वाटमोडे, वैष्णवी चलाख यांच्यासह महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.