२०२५ मधील सर्वात भीषण वादळ ठरले मेलिसा!

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
जमैका,
Melissa became a severe storm २०२५ मधील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ ठरलेले मेलिसा चक्रीवादळ आता जमैकाच्या अगदी जवळ पोहोचले असून त्याने संपूर्ण प्रदेशात हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळाने आधीच हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये किमान चार लोकांचा मृत्यू झाला असून जमैकामध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
 

Melissa became a severe storm 
 
अमेरिकेच्या हवामान तज्ञांच्या माहितीनुसार, या वादळातील वारे १७५ मैल प्रतितास (सुमारे २८२ किलोमीटर प्रतितास) वेगाने वाहत आहेत. त्यामुळे मेलिसाला श्रेणी ५ चे चक्रीवादळ घोषित करण्यात आले आहे. ही वादळांच्या सर्वाधिक धोकादायक श्रेणींपैकी एक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे वादळ मंगळवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) जमैकाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे.
 


सौजन्य- सोशल मीडिया  
जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा आणि पूर व भूस्खलनाचा गंभीर धोका वर्तवण्यात आला आहे. आधीच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे जमिनी ओलसर असल्याने पूरस्थिती आणखी भीषण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जमैकाच्या सरकारने राजधानी किंग्स्टनसह अनेक शहरांमध्ये तात्काळ स्थलांतराचे आदेश जारी केले आहेत. आतापर्यंत ८८१ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान, मेलिसाच्या धडकेपूर्वीच हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सॅंटो डोमिंगो (डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी) येथे ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १३ वर्षांचा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.