नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात १० वर्षीय मुलीचा मृत्यू

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
सिंहभूम,
Naxalites' IED explosion झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात एका निष्पाप १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलीचे नाव सिरिया हेरंज असून ती सियालची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. जंगलातील नक्षलवाद्यांनी गुप्तपणे पुरलेला स्फोटकावर पाय ठेवताच स्फोट झाला. या स्फोटात मुलगी गंभीर जखमी झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
 
 
Naxalites
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून स्फोटाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड आणि निर्दयी कृत्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात आहे. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली असून, स्फोटक लावणाऱ्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना जंगल परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, निरपराध लोकांना लक्ष्य करणाऱ्या अशा घटनांमुळे नक्षलवादाचे क्रौर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.