तभा वृत्तसेवा
वणी,
raghuvansam ashtamarga लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या लेखणीतून साकारलेल्या महाकवी कालिदास विरचित रघुवंशम्च्या निरूपणात्मक लेखमालिकेच्या प्रत्येक सर्गाचे संकलन अविरत प्रकाशन जळगावद्वारे अत्यंत नियमित स्वरूपात प्रकाशित होत असून या ग्रंथ मालिकेचा आठवा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. अमरावतीच्या एका दैनिकात प्रकाशित होत असलेल्या या लेखमालिकेची यापूर्वीच ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विक्रम स्वरूपात नोंद झाली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट या विषयावर विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी निर्माण होत असलेल्या या ग्रंथ मालिकेच्या निमित्ताने समस्त संस्कृत प्रेमींना ही सुवर्णसंधी प्राप्त होत आहे. याविषयी सर्वच संस्कृत प्रेमींद्वारे आनंद व्यक्त होत आहे. महाराज रघु, महाराणी इंदुमती आणि शेवटी महाराज अज अशा तिघांच्या मृत्यूची काळी छटा पसरलेला हा सर्ग. अज इंदुमतीच्या अयोध्या आगमन आणि राज्याभिषेकापासून सुरू झालेला हा सर्ग त्या दोघांच्याही स्वर्गगमनापर्यंतचा कार्यकाळ आपल्यासमोर साकार करतो. महाकवी कालिदासांचे आगळेवेगळे वैभव म्हणजे त्यांनी व्यक्त केलेले पुरुषी दुःख. सामान्यतः दुःखाचा विचार आला की स्त्रीच्या भावनांचा विचार विविध पैलूंसह साहित्यात प्रकट होताना दिसतो. मात्र महाकवी कालिदास हे वेगळ्या अर्थाने पुरुषी दुःखाचे अधिवक्ता आहेत. मेघदूतम्मध्ये व्यक्त केलेली यक्षाची आणि अभिज्ञान शाकुंतलम् नाटकाच्या सहाव्या अंकात शब्दबद्ध केलेली महाराज दुष्यंतांची विरह वेदना हे कालिदासीय साहित्याचे वैभव सर्वाधिक उत्कटपणे प्रगट झाले आहे ते या सर्गात.raghuvansam ashtamarga पुराणात ज्या पद्धतीने करूण रसाचे परमोच्च प्रगटीकरण स्वरूपात कामदेव भगवान मदनाची पत्नी असणाèया देवी रतीच्या रतीविलापाचे वर्णन केले जाते त्याच स्वरूपात पुरुषी दुःखाचे वर्णन म्हणजे हा अजविलाप. महाकवी कालिदासांच्या अज विलापातून ज्या स्वरूपात सगळ्यांच्या दुःखाची अभिव्यक्ती साधली आहे. त्याच स्वरूपात त्यांनी पुढे ब्रह्मर्षी वशिष्ठांच्या उपदेशांच्या निमित्ताने दुःखग्रस्तांचे सांत्वन नेमके कसे आणि कोणत्या शब्दात करावे, याचा वस्तुपाठच सादर केलेला आहे. आजवर रसिकांनी यापूर्वीच्या सर्व ग्रंथांवर केलेला प्रेमाचा वर्षाव या ग्रंथावर देखील व्हावा, असे आवाहन प्रकाशक जयंत कुळकर्णी यांनी केले आहे.