ताजिकिस्तानमधून ७ पंजाबी तरुणांचे सुटका!

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Punjabi youth rescued from Tajikistan ताजिकिस्तानच्या दुशान्बेजवळील रोगुन भागात सप्टेंबर २०२५ पासून अडकलेल्या पंजाबमधील सात तरुणांची शेवटी सुटका करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांमुळे आणि राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहने यांच्या हस्तक्षेपामुळे हे सर्व तरुण भारतात सुखरूप परतले. रूपनगर (पंजाब) येथील या तरुणांना एका एजंटने ‘ड्रायव्हरची नोकरी’ देण्याचे खोटे आश्वासन देऊन ताजिकिस्तानला पाठवले होते. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर त्यांना ड्रायव्हर म्हणून काम करू न देता जबरदस्तीने मजुरी करायला लावण्यात आली.
 

Punjabi youth 
त्यांनी सांगितले की त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत काम करावे लागत होते. थंडी, भूक, पगाराचा अभाव आणि सततच्या भीतीच्या वातावरणात त्यांचे दिवस जात होते. या तरुणांनी ताजिकिस्तानमधूनच एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यात त्यांनी शेखांनी केलेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली होती. त्यांनी दावा केला की ज्या वर्कशॉपमध्ये त्यांना कामासाठी ठेवण्यात आले होते, तेथे जुन्या आणि तुटलेल्या वाहनांनी भरलेले वातावरण होते आणि कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हती.
 
 
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सर्व तरुण पंजाबमधील त्यांच्या घरी रवाना झाले. या घटनेने परदेशी रोजगाराच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे.