तभा वृत्तसेवा
ढाणकी,
pendse guruji vidyalaya युवक मंडळद्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय, ढाणकी येथे आज युवक मंडळ पुसदचे संस्थापक सचिव, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे शिल्पकार कै. के. डी. जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक काईट यांच्या हस्ते के. डी. सरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी शिक्षकांनी के. डी. सरांच्या कार्याचा, विचारांचा आणि आठवणींचा मनोगत स्वरूपात उल्लेख केला. त्यांच्या शिक्षणव्रताच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकत सर्वांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ते पुढे नेण्याचा संकल्प केला. काईट यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, के. डी. जाधव हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते एक शिक्षणप्रेमी द्रष्टे होते. युवक मंडळाची स्थापना करून त्यांनी एका ‘शिक्षणरूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले. समाजातील बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून त्यांनी अतिदुर्गम भागांतही शाळा सुरू केल्या.pendse guruji vidyalaya त्यांच्या प्रयत्नांमुळे आज शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पराते यांनी केले, तर आभारप्रदर्शन चांदेकर यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षकांमध्ये मार्कंडे, सडमाके, पतिराव, मोटाळे, चांदेकर, राठोड आणि कर्मचारी, कदम, संजय कापसे, दशरथ नागरगोजे होते. सर्व उपस्थितांनी के. डी. जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.