तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Silk Industry : उमरखेड तालुक्यात 200 हेड क्षमतेचा संपूर्ण स्वयंचलित रेशीम रेलिंग प्रकल्प उभारण्यासाठी शासनस्तरावरील अनुदान मंजुरी प्रक्रियेला वेग आला आहे. हा प्रकल्प सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्था येथे उभारण्यात येणार आहे.
सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या राज्य रेशीम संचालनालयात आमदार किसन वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, उद्योगपती नितीन माहेश्वरी आणि डॉ. विजय माने यांच्या नेतृत्वात राज्य रेशीम संचालक विनय मून व सहसंचालक महेंद्र ढवळे यांची भेट घेऊन सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला.
त्यानंतर विभागाने स्थळ पाहणीसह प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. संस्थेकडून आवश्यक भागभांडवल आणि जागा उपलब्ध करून देण्यात आली असून शासन अनुदान मंजुरीचा अंतिम टप्पा सुरू आहे. अनुदान नोव्हेंबर महिन्यात मंजूर होण्याची शक्यता असल्याचे संचालनालयाने कळविले.
या प्रकल्पामुळे उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि पुसद तालुक्यातील सुमारे 600 एकर तुती लागवड करणाèया शेतकèयांना स्थानिक पातळीवरच रेशीम कोष प्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहे. वाहतूक खर्चात बचत, धागा निर्मितीनंतर साठवणूक व बाजारभाववाढीचा थेट फायदा शेतकèयांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
संस्थेने उपविधी दुरुस्ती करून रेशीम प्रक्रिया उद्योग समाविष्ट केला असून सहकार विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. पारदर्शक कारभार आणि सुधारणांमुळे संस्था अल्पावधीतच नफ्यात आली असून अ-वर्ग ऑडिट श्रेणी प्राप्त केली आहे.
शेतकèयांना थेट फायदा
रेशीम विभागाने स्थळ पाहणी पूर्ण केली असून शासन अनुदान मंजुरीनंतर लवकरच प्रकल्प उभारणी सुरू होईल. या प्रकल्पामुळे उमरखेड परिसरात रेशीम उद्योग साखळी पूर्ण होऊन शेतकèयांना थेट फायदा होईल.
आमदार किसन वानखेडे