तभा वृत्तसेवा
आर्णी,
Purushottam Gawande : येथे किसान कृतज्ञता कोष हा निधी नोंदणीकृत करून या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या कुटुंबीयांना व आपत्तीग्रस्त शेतकèयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा उपक्रम पुरुषोत्तम गावंडे यांनी मागील तीन वर्षांपासून करीत आहेत. यामधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचे वितरण करण्यात येत आहे.
या उपक्रमात आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी सामाजिक उत्तरदायित्व समजून जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन किसान ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कृतज्ञता कोषचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे पाटील यांनी पत्रपरिषदेत केले.
पुरुषोत्तम गावंडे यांनी 2 ऑक्टोबरला किसान कृतज्ञता कोषची स्थापन केली. यामध्ये त्यांनी 1 लाख रुपये जमा केले. या उपक्रमात काही लोकांनी सहभागी होऊन मदत केली. जमा झालेल्या रकमेतून पहिल्या वर्षी दोन आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या कुटुंबांना मदत देण्यात आली. दुसèया वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत देण्यासाठी यवतमाळ येथे कार्यक्रम घेऊन तेथे आठ आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या कुटुंबाना मदत देण्यात आली.
यावर्षी दीपावलीच्या अगोदर आर्णी तालुक्यातील चिखली येथील कांता पेंदोर, शेंदूरसनी येथील अनुसया तोडसाम, शेंदूरसनीच्या अर्चना वानखडे, आमणीच्या आशा राठोड, दिग्रसचे देवेंद्र ठाकरे यांना त्यांच्या घरी जाऊन पुरुषोत्तम गावंडे यांच्या वतीने धनादेश देण्यात आला.
यावेळी किसान कृतज्ञता कोषचे सचिव यादव ठाकरे, प्रशांत गावंडे, ओजस गावंडे, श्याम ठाकरे, बंडू डाखोरे, प्रल्हाद राठोड, पिंटू राठोड, बंडू गावंडे, श्रीकांत वानखडे, पंजाब पाटील, पांडुरंग गरड यांची उपस्थिती होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्यासाठी किसान कृतज्ञता कोष समितीकडे दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचा पुरुषोत्तम गावंडे यांनी संकल्प केला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी जेवढी शक्य होईल तेवढी मदत देता येईल तेवढी मदत किसान कृतज्ञता कोष समितीकडे जमा करावी, असे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे पाटील यांनी केले. या पत्रपरिषदेला अनंत गावंडे, प्रशांत गावंडे, यादव ठाकरे, ओजस गावंडे, प्रा. अच्युत चेंडकापुरे, अरविंद पाटील यांची उपस्थिती होती.