शेततळ्यातील ताडपत्रीही दुसर्‍यांदा चोरी

सेलगाव (उमाटे) येथील घटना

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
कारंजा (घा.), 
Tarpaulin sheets stolen सेलगाव (उमाटे) येथील शेतकरी अशोक घागरे यांच्या शेतातील शेततळ्यातून ताडपत्री चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २५ रोजी रात्री घडली. यापूर्वीही याच शेतकर्‍याची ताडपत्री त्याच शेततळ्यातून चोरी गेली होती. ताडपत्री चोरी गेल्याने तळ्यातील पाणी वाहून केले. शासनाच्या वतीने शेतात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी शेततळ्यांची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने अनुदानही दिल्या जाते. या शेततळ्यांच्या माध्यमातून शेत जमिनीत चांगल्या प्रकारे पाणी मुरत असल्याने शेतांतील विहिरींच्या पाणी पातळीही वाढ होत असल्याने शेतकर्‍यांचा कल आता शेततळ्यांकडे वाढला आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्याने अशोक घागरे यांच्या सर्वे क्रमांक १६२/१ मधील शेततळ्याची ताडपत्री कापून नेली.
 
 
Tarpaulin sheets stolen
 
त्यामुळे शेततळ्यातील जवळपास ५० टके पाणीसाठा वाहून गेल्याने शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात शेतकरी घागरे यांनी कारंजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही ६ जुलै रोजी त्यांच्या याच शेततळ्यातील काही भागातील ताडपत्री चोरीस गेली होती. त्या घटनेबाबत देखील कारंजा पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने तक्रारीत नमुद आहे. कारवाई न झाल्याने चोरट्यांची हिम्मत वाढल्याचा आरोप शेतकर्‍यांने केला आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, शेतकर्‍याला मदत करावी आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.