पवनारात पदर फाडून बांधले बच्चू कडूंना कर्जमाफीचे बंधन

महाएल्गार मोर्चात शेकडो ट्रॅटर्स

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
Traitors in Maha Elgar Morcha माजी आमदार बच्चू कडू यांया नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातून निघालेला महाऐल्गार मोर्चा काल रात्री वर्धा जिल्ह्यात दाखल होत रात्री सुकळी बाई येथे मुकाम केले. आज २८ रोजी सकाळी ९ वाजता या शेकडो ट्रॅटर रॅलीने वर्धेकडून नागपूरकडे कूच केले. दरम्यान, पवनार येथे ही रॅली पोहोचताच माझं बंधन कर्जमाफी झाल्यावरच सोडा! अशी विनवणी करत येथील महिला संगीता धाकतोड यांनी आपल्या साडीचा पदर फाडून बच्चू कडू यांच्या हाताला बंधन बांधले.
 
 
Traitors in Maha Elgar Morcha
 
बच्चू कडू यांच्या महाएल्गार ट्रॅटर रॅलीला सुकळीबाई येथुन सुरुवात झाल्यानंतर वर्धेत जुनापानी चौकात माजी आमदार कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुकळीबाई येथे राकाँ शप गटाचे नेते अतुल वांदिले, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे यांनी कडू यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठींबा दिला. कडूं यांच्या वाहनाचा ताफा थांबताच संगीता धाकतोड या महिलेने ट्रॅटरवर चढत आमची सुटका कर्जमाफीशिवाय होणार नाही, असं म्हणत साडीचा पदर फाडून त्यांच्या हाताला बांधला. कर्जमाफी झाल्यावरच तुझ्याच हाताने हे बंधन सोडेन. तोपर्यंत हे माझ्यावरचं शेतकर्‍यांचं वचन समजून ठेवतो, असे कडू म्हणाले.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला व युवक जमले होते. पवनारसह लगतच्या सुकळी, झुंज, पळसगाव, सेवाग्राम परिसरातील शेतकर्‍यांनी कडूंच्या स्वागतासाठी एकत्रित रांगा लावल्या होत्या.
 
 
 
बोरी—तुळजापूर महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा पिकांचं नुकसान दाखवणार्‍या फलकांसोबत अनेकांनी वाळलेली सोयाबीन व कपाशीची झाडं, केळीचे घड, अगदी ओलसर मातीतली शेंगंही हातात घेऊन सहभाग नोंदवला. पवनारहून जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी या यात्रेत सहभागी झाले. सुकळी बाईपासुन महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. रस्त्यावरून ट्रॅटर रॅली जात असल्याने एका बाजूने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.
 
सेलू शहरात जंगी स्वागत 
सेलू : शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ तसेच शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांंकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशती संघटनेतर्फे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली महाएल्गार ट्रॅटर रॅली येथील दांढरे टी-पॉईंट येथेे दाखल होताच फटायांच्या आतषबाजीत, घोषणांच्या गजरात व ढोल-ताशांच्या निनादात जंगी स्वागत केले.