दुचाकीला दुचाकीची धडक; निवृत्त मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
Two-wheeler-two-wheeler collision :  बँकेतील काम आटोपून आपल्या घरी परत जात असताना मागून येणाèया दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 28 ऑक्टोबरला दुपारी 1.30 च्या दरम्यान मारेगाव वणी रस्त्यावर सेंट्रल बँकेसमोर घडली. यात मृत्यू झालेल्याचे नाव मुकिंदा पत्रुजी राजूरकर (वय 61, चोपण, मारेगाव) असे होते.
 
 
 
y28Oct-Mukinda-Rajurkar
 
 
 
मुकिंदा राजूरकर हे तीन वर्षांपूर्वी मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. उर्वरित आयुष्य ते आपल्या कुटुंबियांसोबत घालवत होते. मंगळवार, 28 ऑक्टोबरला ते त्यांच्या दुचाकीने बँकेमध्ये गेले होते. तेथील काम आटोपून परतत असताना अर्धसैनिक कॅन्टीन जवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला मागून येणाèया दुचाकीने जोरदार धडक दिली.
 
 
यात राजुरकर खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. काही नागरिकांनी त्यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर वणी येथील खाजगी दवाखान्यात हलविले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 
मारेगाव शहरातील काही जागा अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. राज्य महामार्गालगत बँका, इतर कार्यालय आणि बार आहे. या ठिकाणी जाणाèयांची संख्याही मोठी असते. तसेच भरधाव वाहने चालवणारेसुद्धा कमी नाहीत. या भरधाव वाहन चालवणाèयांमुळे अनेकांना असाच हकनाक जीव गमवावा लागतो.
 
शाळा महाविद्यालयाजवळ गतिरोधकांची गरज
 
 
हा अपघात ज्या ठिकाणी घडला त्याच्याजवळ शाळा आणि महाविद्यालये आहेत. बाजूला बँकासुद्धा आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयांजवळ गतिरोधकाची तातडीची आवश्यकता आहे. याविषयी अनेकदा समाजसेवींनी संबंधित विभाग व प्रशासनाला पत्र दिले. परंतु याकडे डोळेझाक करण्यात आली. याच ठिकाणी अपघात होऊन दोन जीव गेल्याच्या घटना घडलेल्या असताना प्रशासनाला जाग केव्हा येणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे. तसेच पोलिस ठाण्यासमोरील मार्डी चौकामध्येही ऑटोंची रांग लागलेली असते. यामुळेसुद्धा मोठा अपघात केव्हाही घडण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.