बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
आरमोरी, 
leopard attack : तालुक्यातील डोंगरसांवगी येथील वृद्ध महिला पुष्पा नथू राऊत (65) या घराबाहेर शौचालयास गेल्या असता डोंगरी परिसरालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 27 ऑक्टोबरला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
 
 
jkj
 
यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट हा डोंगरीत पळून गेला. महिलेच्या डोक्याला, मानेला आणि हाताला मोठ्या जखमा असल्यामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना मिळाली असता त्यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून महिलेची जखमी विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके यांना तातडीने उपचार करण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
जखमीची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्या जखमी वृद्ध महिलेला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान दिलिप घोडाम यांनी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनी वरुन संवाद साधून जखमी महिलेच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. मात्र या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने नागपूर येथील मेडिकलला रेफर करण्याची गरज पडू शकते, असे सांगितले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ढोलने यांना तातडीने पंचनामा करून जखमी महिलेस भरपाई देण्याची तसेच या परिसरात बंदोबस्त करण्याची मागणीही दिलीप घोडाम यांनी केली आहे.