ओंजळीतील सुख आणि मायेचा सुगंध देणार्‍यापरिवाराने दिल्या लाखाच्या देणग्या

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
यवतमाळ, 
आपले आयुष्य इतरांच्या आनंदासाठी समर्पित करणार्‍या आणि शिक्षणासोबतच संस्काराची पेरणी करणार्‍या मातोश्री लीला श्रीराम कावलकर रविवार, २६ ऑक्टोबर रोजी स्वर्गवासी झाल्या. त्यांच्या पवित्र स्मृतींच्या साक्षीने त्यांचे सुपुत्र Kavalkar family डॉ. विजय कावलकर परिवारातर्फे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टी ठेवून, काही पारंपरिक बाबींना फाटा देत, सामाजिक जाणीव व जागृतीच्या या सोहळ्यात, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या विविध पाच संस्थांना प्रत्येकी २१००० रुपये सहयोग राशी देण्यात आली.
 
 
Kalvarkar
 
यामध्ये भटक्या जमातीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे ओवी फाऊंडेशन, शासकीय रुग्णालयात येणार्‍या व रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना निस्वार्थपणे रक्ताची मदत करणारे निस्वार्थ फाऊंडेशन, वृद्धांचा सांभाळ करणारे खुशाल नागपुरे यांचे आर्णीचे सुशिलाबाई मातोश्री वृद्धाश्रम, अन्नदान क्षेत्रात अविरत कार्य करणारे यवतमाळचे संकल्प फाऊंडेशन आणि शिक्षणापासून वंचित असणार्‍या पारधी समाजातील ५३ मुलींचा सांभाळ करणार्‍या ‘आम्ही सार्‍या सावित्रीच्या लेकी’ या संस्थांचा समावेश आहे. 
 
 
 
Kavalkar family कार्यक्रमचे अध्यक्ष अशोक केवटे यांच्यासह राजेश्वर मोने, अशोक तिखे, रश्मी चांदुरकर, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार कीर्ती गांधी, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणलाल खत्री आदी मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून या सामाजिक उपक‘माचे कौतुक केले. दहा वर्षांपूर्वी आपल्या दिवंगत वडिलांची तेरवी न करता असेच सामाजिक उपक‘म कावलकर परिवाराने केले आहे. आई-वडिलांचे नेत्रदानही त्यांनी करवून घेतले. या कार्यक‘माचे सूत्रसंचालन शशांक केंडे तथा खुणे यांनी केले. कावलकर परिवारातर्फे डॉ. विजया कावलकर यांनी संवेदना व्यक्त केली. आभार संध्या शेवतकर यांनी मानले. या कृतज्ञता सोहळ्यास मोठा आप्तपरिवार तथा समाज बांधव व विदर्भातील गणमान्य नागरिक हजर होते