दिसपूर,
bangladeshi-national-anthem-in-assam आसाममधील ज्येष्ठ काँग्रेस नेते बिधू भूषण दास यांच्यावर कार्यक्रमादरम्यान बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘अमर सोनार बांगला, अमी तोमाय भालोबाशी’ गायल्याचा आरोप झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील बराक व्हॅली परिसरात प्रचंड राजकीय वाद निर्माण झाला आहे. ही घटना श्रीभूमी जिल्ह्यातील इंदिरा भवन येथे सोमवारी काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीदरम्यान घडली.

बिधू भूषण दास, जे भांगा (श्रीभूमी) येथील रहिवासी आणि सेवा दलाच्या जिल्हा युनिटचे माजी अध्यक्ष आहेत, यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या या गाण्याने आपल्या भाषणाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. हेच गीत नंतर बांगलादेशचे राष्ट्रगीत बनले. १९०५ मध्ये बंगालच्या पहिल्या फाळणीच्या काळात टागोरांनी हे गाणे लिहिले होते. मंगळवारी या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. bangladeshi-national-anthem-in-assamभाजपा नेते आणि राज्यमंत्री कृष्णेंदू पॉल यांनी म्हटले, “एका काँग्रेस नेत्याने बांगलादेशचे राष्ट्रगीत गायल्याची माहिती मला मिळाली आहे. काँग्रेसमध्ये काहीही शक्य आहे — त्यांना केव्हा आणि काय गावे हेही कळत नाही. मी व्हिडिओ पाहून पोलिस चौकशीची मागणी करेन.”
सौजन्य : सोशल मीडिया
बंगाली भाषिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या बराक व्हॅली परिसरात भाषा आणि सांस्कृतिक ओळखीचे विषय अत्यंत संवेदनशील मानले जातात. त्यामुळे या घटनेने निवडणूकपूर्व वातावरणात नवा राजकीय रंग चढवला आहे. bangladeshi-national-anthem-in-assam काँग्रेसने हा विषय “किरकोळ मुद्द्याचे राजकीयरण करण्याचा प्रयत्न” असल्याचे म्हटले आहे, तर भाजपाने चौकशीची मागणी केली आहे. राज्य पोलिसांनी सांगितले की अद्याप या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नाही. तथापि, जर व्हिडिओ पुरावा सादर झाला, तर चौकशी सुरू केली जाऊ शकते.