जिल्हयातील शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा: नितीन कुळकर्णी

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
Nitin Kulkarni : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भातील शेतकर्‍यांसांठी नागपूर येथे अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनी दि. २१ ते २४ नोव्हेबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कृषी प्रदर्शनीचा बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन नितीन गडकरी यांचे स्विय सहाय्यक नितीन कुळकर्णी यांनी केले.
 
 
HJH
 
अ‍ॅग्रोव्हिजन प्रकल्पाच्या अनुषंगाने दि. २९ ऑटोबर रोजी बुलढाणा येथील गर्दे वाचनालय सभागृहात संवाद व मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच अ‍ॅग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाचे उद्दिष्ट, शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती तसेच प्रदर्शनात सहभागी होणार्‍या शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपन्यांचे कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
 
 
सूत्रसंचालन शहराध्यक्ष मंदार बाहेकर व आभार प्रदर्शन कृउबाचे सदस्य सुनील देशमुख यांनी केले या संवाद बैठकीला जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे, चंद्रकांत बर्दे, किसान मोर्चा राज्य सचिव दीपक वारे, कामगार मोर्चा राज्य सचिव विश्राम पवार,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन पवार, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, तालुकाध्यक्ष सतीश पाटील,शहर महामंत्री अजित गुळवे अरविंद होंडे, राहुल देशपांडे, अकील मोहम्मद,मुकुंद देशपांडे, दशरथसिंग राजपूत ,महिला मोर्चा शहराध्यक्ष वर्षा पाथरकर, उषा पवार, अलका पाठक, किसान मोर्चा शहराध्यक्ष आशुतोष वाईकर, सुनील रिंढे ,नितीन बेंडवाल, सारंगधर एकडे, सचिन टेंभीकर, मिलिंद कुलकर्णी, राजू पाठक, महादेव शिराळ यांसह शेतकरी बांधव, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.