अक्षय कुमारचा कॉमेडी तडका!

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
मुंबई,
akshay kumar बॉलीवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार नेहमीच आपल्या नव्या चित्रपटांच्या घोषणेमुळे चर्चेत असतो. वर्षभरात चार-पाच चित्रपट पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अक्षय या वर्षी आधीच चार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणून व्यस्त राहिला आहे. आता त्याच्या पुढील चित्रपटांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 

akshay kumar  
प्रियदर्शनसोबत akshay kumar  अक्षय सध्या तीन मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे — ‘भूत बंगला’, ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी 3’. या तिन्ही चित्रपटांपैकी पहिल्या दोन चित्रपटांचे प्रदर्शन याच वर्षात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीर्घ काळानंतर प्रियदर्शन आणि अक्षय पुन्हा एकत्र काम करत असल्याने या चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत.याशिवाय अक्षयच्या हातात ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपटही आहे. मात्र, सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्याची आणि दिग्दर्शक अनीस बज्मी यांची नव्या चित्रपटासाठी झालेली जोडी. अलीकडे अशी चर्चा होती की दोघे मिळून ‘राम और श्याम’च्या धर्तीवर डबल रोल कॉमेडी चित्रपट करणार आहेत. परंतु ताज्या अहवालांनुसार हा प्रोजेक्ट काहीसा वेगळा असणार आहे.
 
 
अनीस बज्मी आणि akshay kumar  अक्षय कुमार आता एका पूर्णपणे नव्या फॅमिली कॉमेडी-ड्रामा चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. या अनटायटल्ड चित्रपटाचे निर्मितीकार्य प्रसिद्ध तेलुगू निर्माता दिल राजू यांच्या श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स या बॅनरखाली होणार आहे. सध्या चित्रपट प्री-प्रॉडक्शन टप्प्यात असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असल्याचे समजते.चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आणि इतर कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू आहे. अनीस बज्मी या चित्रपटासाठी विविध वयोगटांतील प्रेक्षकांना आवडेल असा दमदार कलाकारांचा संच तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.अनीस बज्मींचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट भूल भुलैया 3’ (२०२४) होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे अक्षय कुमार आणि अनीस बज्मी ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याची बातमी चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.अक्षयच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आणखी एक आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण त्यांच्या ‘खिलाडी’चा विनोदी आणि कौटुंबिक अंदाज पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.