अमरावती,
Amravati police शेती उपयुक्त ट्रॅक्टर, ट्रॉली, इतर अवजारे व तसेच मोटारसायकल, मालवाहू वाहन चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. त्यांच्याकडून ३३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण ५ जणांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे.
पोलिस स्टेशन भातकुली Amravati police येथे सदानंद पांडूरग बोचे यांनी १९ ऑक्टोबर रोजी सोनालीका कंपनीचा टॅक्टर त्यांचे राहते घरासमोरून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला, अशी तक्रार दिली होती. त्या आधारावर गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण याचे मार्गदर्शनात तपास सुरू झाला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहीती एकत्र केली. त्यात ट्रॅक्टर पो.स्टे बोरगाव मंजू या भागात नेल्याचे निर्दशनास आले. त्या भागात गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त करून आरोपीतांचा शोध घेण्यात आला. त्यात भूषण श्रीकृष्ण ठाकरे (वय २४, रा.अनकवाडी), गजानन प्रल्हाद ताठे (वय २५ रा. मारोडी), मधु मिलिंद शिरसाठ (वय ३० रा. आपोती खुर्द), कार्तीक संजय पोहकार (वय २३ रा. मारोडी), वैभव उर्फ छकुला बाबुजी आठवले (वय २७ रा. कपीलेश्वर) फरार व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांची ओळख पटविण्यात आली.
सदर आरोपी यांचेवर Amravati police यापूर्वी अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजु, तेल्हारा, दहीहंडा पोलिस स्टेशन येथे खुन, रेती चोरी, ट्रॅक्टर चोरी, डिझल चोरी याप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. उपरोक्त आरोपितांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विश्वासाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. सदर गुन्हातील चोरी केलेली वाहने शुभम दिनंकर मानकर (रा. भ्ाुईखेड पो.स्टे येवदा), सोहेल अली इद्रीस अली (रा.वाठोडा शुक्लेश्वर), ३) इम्रान शेख उर्फ गब्बर (रा.काठीपूरा अंजनगाव सुर्जी), नौशाद नवाब अहेमद नवाब (रा.गुलझार कॉलनी बैतूर रोड परतवाडा),संजय मधूकर कातखेडे (रा.वडद बुजरूग) यांच्यामार्फत विक्री केल्याचे सांगितले. त्यानी अजून किती वाहने विक्री केली आहे याबाबतचा तपास सुरू असूनत्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई सपोनि मनीष वाकोडे, अजय मिश्रा, फिरोज खान, सतीश देशमूख, मंगेश लोखंडे, सैयद नाझीम,रणजीत गावंडे, सागर ठाकरे, चेतन कराडे, संदीप खंडारे, प्रभात पोकळे यांनी केलेली आहे.