अमरावती,
Panchayat school Amravati अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा मासोद पं. स. अमरावती येथे भेट दिली असता विषय शिक्षक राणा गावंडे हे शाळेत हजर नव्हते. सातत्याने सुट्टीवर जाणे, वर्ग अध्यापनाची काम न करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याबद्दल गावकर्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी सदर शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष शहानिशा केली व राणा गावंडे यांना निलंबित केले. विशेष म्हणजे ते शिक्षक बँकेचे संचालक देखील आहेत.
राणा गावंडे यांची Panchayat school Amravati मूळ शाळा ही बोरगाव धर्माळे ही आहे. तेथे देखील त्यांच्याविरोधात विद्यार्थी व गावकर्यांच्या खूप तक्रारी होत्या. शाळेत न येणे, विद्यार्थ्यांना न शिकवणे, वारंवार सुट्टीवर जाणे, त्यामुळे त्यांची प्रतिनियुक्ती ही जिल्हा परिषद शाळा इंदला येथे देण्यात आली होती. तेथे देखील त्यांच्या खूप तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा त्यांना जिल्हा परिषद शाळा लोणटेक पंचायत समिती अमरावती येथे प्रतिनियुक्तीवर बदली देण्यात आली होती. तिथे देखील ते व्यवस्थित काम करू शकले नाही. विशेष म्हणजे त्या शाळेवर त्यांच्या पत्नी देखील कार्यरत होत्या. ते अत्यंत वादग्रस्त झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच त्यांचा निलंबनाचा आदेश काढून त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे
राणा गावंडे Panchayat school Amravati शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. आता ते सामान्य सभासदांचे प्रश्न कसे सोडवतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या विसंगत भूमिकेमुळे सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. नुकताच त्यांनी शिक्षक बँकेच्या अध्यक्षाच्या दालनावर आपला राजीनामा चिपकवला होता. निलंबनानंतर त्यांना पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे पदस्थापना देण्यात आली आहे. आता त्यांच्या डिपारमेंटल इन्क्वायरी मध्ये काय तथ्य बाहेर येते व ते शिक्षक म्हणून कायम राहतात की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे