आशिष कोरेटी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
गडचिरोली, 
Ashish Koreti : वन जन हक्क (वजह) फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी 27 ऑक्टोंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील गंभीर प्रश्‍न आणि आदिवासींच्या समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
 

KORATI 
 
 
 
या चर्चेदरम्यान आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि वनहक्काशी संबंधित विषयांवर सखोल संवाद साधण्यात आले. डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी आदिवासींच्या मूलभूत हक्कासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. तसेच आता झालेल्या अवकाली पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिरावलेला आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना भरिव मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
 
 
ग्रामीण भागात इंटरनेटच्या लपंडावाने शेतकर्‍यांना ई-पीक करण्यासाठी मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ई-पीक ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावे. ओबीसी समाजाच्या महाज्योती योजनेची सुद्धा प्रभाविपणे अंमलबजावनी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
 
 
यावेळी अनुसूचित जनजाति आयोग नवी दिल्लीच्या सदस्या तथा नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते, माजी नायब तहसीलदार लोमेश उसेंडी, सारंग जांभूले, श्रीकांत आतला, तौफीक ख़ान, अंकुश गाढवे, नीलकंठ गोहने, विलास कोरेटी, गणेश मडावी, प्रकाश हलामी, राकेश खुने, महेश उसेंडी, दीपक कोल्हे, विश्‍वेश्‍वर खुणे, उमेश सहारे, स्वप्निल शिंपी, शिवकुमार भैसारे, भगवान सहारे, प्रभाकर तुलावी, पंकज कोल्हे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्ते उपस्थित होते.
 
 
या भेटीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, वनहक्क कायद्याची अमलबजावणी तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचनी याबाबतही चर्चा करन्यात आली. आदिवासी समाजाच्या प्रश्‍नांवर प्रशासनाशी समन्वय साधुन सकारात्मक उपाययोजना राबवीने हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.कोरेटी यांनी यावेळी सांगीतले.