राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न

शहर महिला अध्यक्ष सुनीता येरणे

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नागपूर,
defame ncp राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या ’दीपावली मिलन’ कार्यक्रमातील लावणी नृत्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करीत विरोधकांनी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शहर महिला अध्यक्ष सुनीता येरणे यांनी केला.
यावेळी पत्रपरिषदेत माधुरी पालीवाल, सविता रंगारी, रेखा चरडे आदी उपस्थित होते.
 
 
 
ncp
 
 
लावणी नृत्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करणार्‍या संबंधित पदाधिकार्‍यावर कडक कारवाई करण्यासाठी पक्ष कार्यालयाने दखल घेतली आहे. पक्षातील विरोधकांनी लावणीव्दारे चुकीचा प्रचार केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर सात दिवसांच्या आत लेखी खुलासा मागवला आहे. पक्षाच्या कार्यालयात अशाप्रकारचे कार्यक्रम होणे योग्य नाही. संबंधित पदाधिकार्‍यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे सांगण्यात आले आहे.defame ncp दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहा मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात मराठी सांस्कृतिक परंपरा जपणार्‍या लावणी कलाकार शिल्पा शाही यांचा समावेश होता. दिवाळीनिमित्त सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.