अविनाश चावरे भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Avinash Chavare : विश्रामभवनात झालेल्या जिल्हा बैठकीत जवळा (हेटी) येथील भाजपाचे आर्णी तालुक्याचे प्रभारी अविनाश सुदाम चावरे यांची युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटना युवा आर्णी तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असून 27 ऑक्टोबरला शासकीय विशामगृहात नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
BJP
 
ही निवड मदन येरावार यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी केली. यावेळी आमदार किसन वानखेडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान, भाजपा महामंत्री राजू पडगिलवार, भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा सुरज गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
 
 
अविनाश सुदाम चावरे यांच्या नियुक्तीमागे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जगलाल बैठवार यांच्या विशेष शिफारशीवरून ही निवड करण्यात आली. तर पक्ष वाढवण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार असल्याने अविनाश सुदाम चावरे यांच्यावर सर्व स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.