बँक खात्याचा गैरवापर करून जीवे मारण्याची धमकी

६ जणांवर गुन्हे दाखल

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
वर्धा,
Wardha crime news विश्वासाने मित्राला स्वत:च्या नावाने उघडलेले बँक खाते सोपविण्यात आले. गैरवापर करीत याच बँक खात्यात विविध लोकांकडून पैसे स्वीकारून मित्रालाच धोका देण्यात आला. ही बाब लक्षात आल्यावर मुळ बँक खाते धारकाने विचारणा केल्यावर त्यालाच ठार करण्याची धमकी देत ८० हजारांच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली. या प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात ६ जणांवर २८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Wardha crime news  
स्थानिक  Wardha crime news   गौरक्षण भागातील शशांक आटे याने मित्र रोशन भोयर रा. गौरक्षण वार्ड याला स्वत:च्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन खाते काढून पासबुक काही दिवसांच्या वापरण्याकरिता दिले. रोशनने हेच बँक खाते वापरण्यासाठी इतरांना दिले. बराच दिवसांचा कालावधी लोटल्यावर बँकेच्या पासबुकची मागणी शशांक आटे याने रोशनकडे केली. पण, नंतर इतरांचे नाव घेत बँक खात्याचा होणार्‍या वापरा पोटी १४ हजार रुपये देण्याचे ठरले. पण, दुसर्‍या-तिसर्‍याचे नाव पुढे करीत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशातच आपल्या बँक खात्याचा वापर कुठल्यातरी चुकीच्या कामासाठी होत असल्याचे लक्षात आल्यावर शशांकने बँकेत जाऊन पासबुक हरविल्याचे सांगत पुन्हा पासबुक मिळविले. शिवाय आपले बँक खाते इतरांना वापरण्यास देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर बँक खात्यात जमा असलेले पैसे पैसे टाकणार्‍यांना परत देईल असा पवित्रा घेतला. अशातच या प्रकरणातील आरोपींनी पैसे दे, अन्यथा ठार करतो असे म्हणत थेट ८० हजारांच्या खंडणीची मागणी शशांकला केली. या प्रकरणी शशांकने शहर पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी रोशन भोयर रा. गौरक्षण, रोहित जांगडे, सय्यद फरमान अली, चाँद पठाण रा. पुलफैल, परवेज उर्फ फर्रू चौघेही रा. नागपूर, आसिफ शेख रा. पुलफैल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.