वर्धा,
MahaElgar protest Nagpur नागपुरात सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल पर्यटनाला बसला आहे. आज बुधवारी सकाळी केवळ दोनच जिप्सी बोरच्या सफारी ट्रॅकवर धावल्या.
बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता व पट्टेदार वाघांसह इतर वन्यजीव पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी नंदनवन असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची गर्दी होते. सध्या नागपूर येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकडे येणारे मार्ग जाम झाल्याने बोरच्या जंगल पर्यटनाला फटका बसला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही जिप्सीतील पर्यटक जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा व तालुयाचे स्थळ असलेल्या सेलू येथील होते. या पर्यटकांना बोरची राणी बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीचे छाव्यांसोबत दर्शन झाले. तर एका बिबट्याचीही सायडिंग झाले.
दुपारच्या सफारीसाठी १४ जिप्सीची बुकींग
दुपारच्या जंगल सफारीसाठी १४ जिप्सींचे ऑनलाईन बुकिंग झाले आहे. बुधवारी दुपारची जंगल सफारी करू इच्छिणार्यांत हैदराबाद येथील विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांनी दुपारच्या जंगल सफारीसाठी ऑनलाईन बुकींग पुर्वीच केली आहे. सध्या सेलू तालुयातच असल्याचे सांगण्यात आले. इतर पर्यटक मात्र सायंकाळपर्यंत पर्यटनासाठी पोहोचले नव्हते.