नागपूर,
chief-minister-fadnavis महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे राज्य सरकार खासगीकरण करणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.
वीज कर्मचार्यांच्या प्रश्नावर करण्यासाठी रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व संयुक्त सचिव पी.व्ही. नायडू यांनी भेट घेतली. chief-minister-fadnavis वीज कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाली. तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकार्यांच्या प्रश्नासंदर्भात माहिती देण्यात आली. वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकार्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.