'तो' कंडोम पाईपलाईनचा VIDEO दिल्लीतील मुलींच्या वसतिगृहाचा नाही; जाणून घ्या तथ्य

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
condom-pipeline-video नाल्यात वापरलेल्या कंडोमचा ढीग… आत आणि बाहेर फक्त कंडोमच कंडोम! असा दावा करण्यात येत आहे की दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये इतके कंडोम वापरले गेले की सीवर लाइनच जाम झाली. गेल्या दोन-तीन दिवसांत ही बातमी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि वॉट्सअॅपवर लोक आश्चर्याने हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, या दाव्यामागचं खरं वास्तव काहीसं वेगळंच आहे.

condom-pipeline-video 
 
१९ सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. condom-pipeline-video या व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर सीवर आणि नाल्याची साफसफाई सुरू असल्याचे दिसते. बाहेर वापरलेल्या कंडोमचे मोठे ढीग पडलेले आहेत, आणि नाल्यातसुद्धा कंडोम तरंगताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा पाय दिसतो, आणि काहींनी या क्लिपला पार्श्वभूमीवर गाणं किंवा म्युझिक लावलं आहे. या व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की तो दिल्लीतील एका पीजी गर्ल्स हॉस्टेलचा आहे. एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ “दिल्ली PG गर्ल्स हॉस्टेलची कंडोममुळे पाइपलाइन ब्लॉक झाली, आता सांगा मुली दिल्लीला शिकायला येतात की काहीतरी वेगळंच करायला?” अशा कॅप्शनसह शेअर करण्यात आला. इंस्टाग्रामवरही अनेक यूजर्सनी अशाच मजकुरासह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
मात्र आम्ही या व्हिडिओची चौकशी केली असता, वेगळंच सत्य समोर आल. condom-pipeline-video व्हिडिओच्या काही फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासल्यानंतर आढळल की हा व्हिडिओ दिल्लीचा नसून काही दिवसांपूर्वी आफ्रिकन चॅनेल्सवर शेअर करण्यात आला होता. ‘Crazy Buddies’ नावाच्या एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ १७ ऑक्टोबरला नायजेरियातील एका व्यक्तीने शेअर केला होता. त्या पोस्टमध्ये लिहिल होत की, “घरातून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती, जेव्हा  गटार उघडून पाहिल तेव्हा आत डझनभर वापरलेले कंडोम सापडले. त्यामुळे सर्वजण थक्क झाले.”
सौजन्य : सोशल मीडिया 
तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरील EDO Online TV या पेजवरही १३ ऑक्टोबरला अपलोड केलेला तोच व्हिडिओ सापडला. condom-pipeline-video त्यामध्ये पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषेत एक व्यक्ती म्हणताना ऐकू येतो — “हे नायजेरिया आहे, सर्वत्र कंडोमच कंडोम दिसत आहेत.” या सर्व पुराव्यांवरून स्पष्ट होतं की सोशल मीडियावर दिल्लीचं म्हणून दाखवला जाणारा हा व्हिडिओ प्रत्यक्षात नायजेरियाचा आहे. त्यामुळे दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.