आजपासून ठेकेदारांचे काम बंद आंदोलन

हिवाळी अधिवेशनातील कामांवर बहिष्कार

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नागपूर,
contractors strike हिवाळी अधिवेशनातील १५० कोटी रुपयांचे बिल अद्यापही प्रलंबित असून गत वर्षीचे देयके ठेकेदारांना मिळालेले नाही. त्यामुळे बुधवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी संजय मैंद, रूपेश रणदिवे, नरेश खुमकर, राकेश आसाटी, विनय सहारे, विपिन बंसोड, शिरीष गोड, गोविंद डेहडकर आदी उपस्थित होते.
 
 

contractor  
 
 
ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता रवीभवन येथे नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी एकत्रित येणार असून दिवसभर कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविणार असल्याची माहिती सुबोध सरोदे यांनी दिली.
 
९३.८४ कोटी रुपयांच्या निविदा जारी
दिवाळीपूर्वी ठेकेदारांना पेमेंट द्यावे, अशी मागणी केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. येत्या ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु असताना काम बंद आंदोलनाचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर परिणाम होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी पीडब्ल्यूडीने ९३.८४ कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत. तसेच अनेक कामांचे वर्कऑर्डरही देण्यात आले आहेत. मात्र, काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्व कामे ठप्प होणार आहे.
देयकासाठी वर्ष भरापासून प्रयत्न वर्षभरातील विविध देयके शासनाने न दिल्यामुळे लहान कंत्राटदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.contractors strike वेळीच देयके मिळावेत यासाठी कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या वर्ष भरापासून प्रयत्न करीत आहेत. तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या संघटनेचे शिष्टमंडळ भेटून विनंती पत्रेही दिले आहे. याशिवाय प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान कंत्राटदारांची देयके सर्व काटून देण्याचे आश्वासन ही दिलेले होते.