देवळी,
Deoli railway crossing accident वर्धेकडून देवळीकडे राष्ट्रीय महामार्गाने जात असलेल्या वर्धा येथील दुचाकीस्वाराचा २८ रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान रेल्वे क्रॉसिंगजवळ अपघात झाला.
रेल्वे पटरीच्या अगोदर असलेल्या मोठ्या व उंच गतिरोधक न दिसल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन ती थेट रेल्वे पटरीवर जाऊन घसरली. दुचाकीस्वार रूळावर आपटल्याने डोयाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, मागून येणार्या पत्रकारांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ आपली वाहने थांबवून जखमीला बाजूला उचलून सुरक्षित स्थळी हलविले. घटनेची माहिती मिळताच सेलसुरा येथील भोर्जेकर हे रुग्णवाहिका घेऊन आले आणि जखमीस सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. या रेल्वे क्रॉसिंगवर गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारचे अनेक अपघात होत आहेत. तरीदेखील रेल्वे विभागाकडून कोणतीही दखल घेतल्या गेली नाही. रुळाच्या अगोदर तयार करण्यात आलेला गतिरोधक हा रात्री नजरेस येत नसल्याने अपघात होतात. तर चारचाकी वाहने या गतिरोधकावर जाताना वाहनांच्या खालील भागास मार लागून वाहनांचे मोठे नुकसानही होते.