डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण दर्शनावर राष्ट्रीय चर्चा

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इंटरचेयर कार्यक्रम

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नागपूर,
dr-babasaheb-ambedkars-philosophy राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात “शिक्षणाचा इतिहास आणि दलित, आदिवासी आणि महिलांची मुक्तता” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय इंटरचेयर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभीमत) विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा इंटरचेयर कार्यक्रम पार पडला.
 
 
dr-babasaheb-ambedkars-philosophy
 
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी भूषविले, तर प्रमुख उद्घाटक व मुख्यवक्ते म्हणून जेएनयू, नवी दिल्ली येथील प्रा. सुरेश बाबू उपस्थित होते. प्रा. सुरेश बाबू यांनी 'डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे शिक्षण आणि सामाजिक मुक्तीचे तत्वज्ञान' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी म्हणून आलेले अनुभव, त्यांचा जॉन ड्युई यांच्याशी असलेला बौद्धिक संबंध आणि मानसशास्त्र ते सामाजिक मानसशास्त्र या प्रवासाचे विश्लेषण केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अविनाश फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाबरोबरच शीला ला महत्त्व कसे दिले याचे उदाहरण देऊन सत्राचा समारोप केला. यानंतर झालेल्या पॅनेल चर्चेत मयूर कुडुपडे (दिल्ली), मोनालिसा बेहरा (पुणे) आणि डॉ. लक्ष वेंकटरमण, (सहयोगी प्राध्यापक, स्कूल ऑफ लिबरल आर्ट, एम.आ. टी. पुणे) यांनी सहभागी घेत 'शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन' या विषयावर विचार व्यक्त केले. dr-babasaheb-ambedkars-philosophy या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. सुरेश बाबू यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. अजय चौधरी यांनी भूषविले. या सत्रात डॉ. प्राची पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कवितांतील शिक्षणविषयक दृष्टिकोनाचे विश्लेषण केले, तर डॉ. मिलिंद घाटे यांनी दलित समाजाच्या शैक्षणिक संघर्षावर आणि डॉ. धनंजय सोनटक्के यांनी स्त्रीशिक्षण व पितृसत्तेविरोधातील संघर्षावर मांडणी केली. या कार्यक्रमात प्राध्यापक वृंदासह एम.ए.च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.