शेतकरी आंदोलनामुळे ‘जाम’ चौरस्ता ‘जाम’

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर,
Bachchu Kadu माजी राज्यमंत्री, प्रहार जनशती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे जाम चौरस्त्यावर आंदोलनाला जाणारे वाहने अडकल्याने वाहनातील शेतकरी चौरस्त्यावर उतरून बसल्याने चारही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 

Bachchu Kadu  
बच्चू यांनी काढलेल्या महाएल्गार ट्रॅटर रॅलीने नागपूरचे रस्ते पूर्णपणे थांबवले. त्यामुळे जाम झालेल्या चौरस्त्यावरून जाणारी वाहतूक खोळंबल्याने चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार रवींद्र रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे, गिरीश मोहतुरे, अनिल वाघमारे, यांच्यासह पोलिस कर्मचारी जाम चौरस्त्यावर येऊन नागपूरकडे जाणारी वाहतूक वळवून उमरेड मार्गे सुरू केली.