तभा वृत्तसेवा
हदगाव,
hadgaon-municipality-congress : हदगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उमेदवारांची चांगलीच लगबग दिसून येत आहे. गत दहा वर्षांपासून हदगाव नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता कायम असून, यंदाच्या निवडणुकीतही सत्ता टिकविण्यासाठी पक्षाच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हदगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांमधून नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व प्रदेश काँग्रेस कार्यकारी सदस्य सुनील सोनुले यांच्या मार्गदर्शनात स्वीकृत करण्यात आले. इच्छुकांनी पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी सौ. शालिनी चेतन देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवकपदासाठी प्रभागनिहाय इच्छुकांमध्ये प्रभाग क्र. 1 (अ) मंदा संतोष काळे आणि (ब) शेख तौसीफ शेख शामुद्दीन, प्रभाग क्र. 2 (अ) सुदाम रामचंद्र राऊतराव आणि (ब) सुलतान बेगम खदीर खान, तर प्रभाग क्र. 3 (अ) सुजाता मिलिंद परसोडे, मनीषा मिलिंद शिंगारे आणि (ब) विनोद बळीराम राठोड, अमितकुमार उद्धवराव अडसूळ यांचा समावेश आहे.
प्रभाग क्र. 4 (ब) मध्ये खदीरखान वाहेदखान, शेखजावेद शेखउमर चाऊस आणि शेख अहमद शेख अब्बास यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्र. 5 (अ) मधून धुरपता किसन देवकर यांनी अर्ज दाखल केला असून (ब) मधून शेख आयाज शेख कुरेशी व संदीप गणपत शिंदे यांनी नावे दाखल केली आहेत. प्रभाग क्र. 6 (ब) मधून राणी रुपेश गिरबिडे, सुरेखा सुदाम राऊतराव आणि प्रिया आशिष सोनुले यांनी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्र. 7 (अ) सुमित तुकाराम चिंचोलकर, तर (ब) करुणा संतोष भोसकर आणि समरीन कौसर शेख तौसीफ हे इच्छुक आहेत. प्रभाग क्र. 8 (अ) हरीश रमेश सोनुले आणि (ब) अकतरबी शेख नजरुद्दीन यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग क्र. 9 (अ) आनंद गणपत कांबळे , जगदीश नागोराव कदम, तर (ब) अभिदा बेगम शेख अब्बास, रुक्सार शेख बेगम अहमद आणि शाहिदा रहीमखान पठाण यांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 10 (अ) ज्योती विनोद राठोड आणि (ब) संदीप बापूराव सोनुले, शेख अहमद शेख अब्बास, मोहसीनखान रहीमखान पठाण तसेच शेख साजिद शेख नजरोद्दीन यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली.
गत दहा वर्षांपासून नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा संघटित तयारी सुरू केली असून प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने इच्छुक पुढे येत आहेत. येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असून, हदगावमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. पुढील सर्व माहिती काँग्रेस पदाधिकारी करून देण्यात आली आहे.