आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते माता मंदिराचे भूमिपूजन

(ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाला मिळणार नवसंजीवनी)

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
गडचिरोली, 
Milind Narote : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर विसापूर येथील माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन आज आमदार डॉ. मिलींद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
 

MLMJ 
 
 
 
विधिवत पूजन करून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कुदळ टिकास मारून भूमिपूजनाची औपचारिक पार पाडली. मंत्रोच्चार, फुलांची आरास आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या मंदिराच्या उभारणीमुळे ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाला नवसंजीवनी लाभणार असून धार्मिक व सांस्कृतिकदृष्टीने गावात नवचैतन्य निर्माण होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, ग्रामविकास हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. स्थानिक विकास निधीतून गावोगावी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विसापूर येथील माता मंदिर बांधकाम हे श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम घडविणारे ठरेल. स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून होत असलेली ही उभारणी गावाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण व सुविधा विकासाद्वारे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, केशव निंबोड, माजी सरपंच भास्करराव कोटगले, नक्टु पेटकर, महादेवराव भोयर, अर्चना निंबोड, पायल कोडापे, आशिष रोहनकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.