शप राकाँकडून निवडणुकीसाठी रणनीती मंथन

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
मित्रपक्षांकडून सन्माननीय जागा मिळण्याची अपेक्षा

हदगाव, 
आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शप NCP Nivaḍṇuk Manthan राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक हदगाव शहरातील राकाँ पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात सखोल चर्चा व मंथन करण्यात आले. या बैठकीला शप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. देवराव बाभळीकर, चिटणीस दादासाहेब शेळके, तालुका अध्यक्ष वसंत देशमुख, शहराध्यक्ष फिरोजखान पठाण, माजी पदाधिकारी अभिजित रुद्रकंठवार, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, जयनो पठाण, जावेद खान व सिद्धार्थ ढगे हे उपस्थित होते.
 

y29Oct-Manthan 
 
बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद NCP Nivaḍṇuk Manthan निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करताना, मित्रपक्षांसोबत सन्मानपूर्वक जागावाटप होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थित पदाधिकार्‍यांनी एकमताने असे नोंदविले की, निवडणुका महाविकास आघाडीच्या चौकटीतच लढवाव्यात. मात्र मित्रपक्षांनी आम्हाला योग्य सन्मान आणि अपेक्षित जागा द्याव्यात. तालुका अध्यक्ष वसंत देशमुख म्हणाले, हदगाव आणि शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत भाग घेण्यासाठी शप राकाँ कार्यालयात येऊन अर्ज भरावेत. पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांना समान संधी मिळेल आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखत जागावाटप होईल.
 
 
NCP Nivaḍṇuk Manthan बैठकीत पुढे असेही ठरविण्यात आले की, स्थानिक पातळीवर मित्रपक्षांशी सलोख्याने वाटाघाटी करून आघाडी कायम ठेवली जाईल. निवडणूक ही स्पर्धा असली तरी मैत्रीपूर्ण आणि लढवली जावी, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. शप राकाँच्या या बैठकीमुळे हदगाव तालुक्यात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांतच इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.