नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री राहणार!

अमित शहा यांची मोठी घोषणा

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
दरभंगा,
Nitish Kumar is CM of Bihar दरभंगामध्ये आयोजित एनडीएच्या निवडणूक प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा सर्व संभ्रम दूर केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले की, एनडीए जर सत्तेवर आली, तर मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील. गृहमंत्री शहा म्हणाले, सोनिया गांधी आपल्या मुलाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहतात, लालू यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पाहतात. पण मी स्पष्ट सांगते आहे, ना दिल्ली, ना पाटणा, कुठेही खुर्ची रिकामी नाही. पाटण्यात नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत आणि तसेच राहतील.
 
 
Nitish Kumar is CM of Bihar
या घोषणेमुळे एनडीएमध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा निर्माण झाला आहे, विशेषतः जनता दल (युनायटेड) कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विरोधी महाआघाडीतील नेते गेल्या काही आठवड्यांपासून प्रचारसभांमध्ये असा दावा करत होते की, निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना बाजूला करून स्वतःचा मुख्यमंत्री नेमणार. मात्र, अमित शहांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे ते सर्व अंदाज फोल ठरले आहेत.
अमित शहा यांनी शिवराज सिंह चौहान यांचे उदाहरण देऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. मध्य प्रदेशप्रमाणे बिहारची परिस्थिती वेगळी आहे. एनडीएमध्ये स्थिर नेतृत्व आहे आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच राज्य प्रगती करेल, असे ते म्हणाले. दरभंगातील सभेत त्यांनी एनडीएच्या उमेदवारांना प्रचंड समर्थन देण्याचे आवाहन केले. गेल्या वेळी दरभंगामधील दहा पैकी नऊ जागा एनडीएला मिळाल्या होत्या, यावेळी आपण सर्व दहा जागा जिंकू. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असे शहा यांनी आत्मविश्वासाने सांगितले. अमित शहांच्या या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. एनडीएच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून, महाआघाडीच्या प्रचारातील “मुख्यमंत्री बदलणार” या हत्याराचे धार कमी झाल्याचे स्पष्ट दिसते.