जौनपूर,
old-man-died-on-first-night जौनपूर येथील ७५ वर्षीय संगरु राम याने ३५ वर्षीय मानभावती नावाच्या महिलेशी लग्न केले. हे त्याचे दुसरे लग्न होते. संगरु राम याच्या पत्नीचे फक्त एक वर्षापूर्वीच निधन झाले होते आणि मानभावतीलाही तिच्या मागील लग्नापासून तीन मुले होती.

संगरु राम याला मुले नव्हती, म्हणून त्याला एका सोबतीची आवश्यकता होती. दुसरीकडे, त्या महिलेने तिच्या तीन मुलांच्या भविष्यासाठी लग्न केले होते. पण लग्नाच्या रात्रीनंतर संगरु रामचा मृत्यू कसा झाला हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या लग्नाच्या रात्री सकाळी संगरु राम अचानक आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाने त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत संगरु रामचा मृत्यू झाला होता. या जोडप्याने २९ सप्टेंबर रोजी लग्न केले होते. संगरू रामची पत्नी मनभावती हिने सांगितले की, “माझ्या नवऱ्याने मला लग्नाच्या आधीच म्हटले होते की, ‘तू फक्त माझंघर सांभाळ, तुझे मुल माझ्या जबाबदारीत असतील.’ लग्नानंतर आम्ही दोघ रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिलो.” ती पुढे म्हणाली, “मी बोलताना भावूक झाले तेव्हा त्यानी मला सावरत सांगितल, ‘काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेन.’ सकाळी सगळ ठीक होत. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवलो. त्यानंतर त्यांनी मला सांगितल, ‘तू मुलीला घेऊन आत झोप, मी बाहेर झोपतो.’ मी मग खोलीत जाऊन झोपले.” मनभावती पुढे म्हणाली, “सकाळी त्यांनी आम्हा सगळ्यांना उठवल, पण काही वेळानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. आम्ही त्यांना तात्काळ रुग्णालयात नेल, पण तेव्हापर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.” संगरू राम याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. old-man-died-on-first-night त्याच्या मृत्यूच नेमक कारण काय याबद्दल अनेक तर्क-वितर्क सुरू होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून समोर आल आहे की संगरू राम याचा मृत्यू शॉक-कोमामुळे झाला होता.