पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याचा कडक इशारा: "अफगान तालिबान नष्ट करून गुहेत टाकू"

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
इस्लामाबाद,  
pakistans-defense-ministers-warning पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील शांतता चर्चेच्या अपयशानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणाच्या टोकावर पोहोचले आहेत. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाणिस्तानला थेट मोठी धमकी दिली आहे. इस्तांबुल (तुर्की) येथे झालेल्या चार दिवसीय शांतता चर्चेच्या अपयशानंतर आसिफ यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर लिहिले, “जर भविष्यात पाकिस्तानच्या भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही अफगाण तालिबान शासनाचा पूर्णतः नायनाट करू आणि त्यांच्या लढवय्यांना पुन्हा डोंगरातील गुहांमध्ये ढकलून देऊ.”
 
 
pakistans-defense-ministers-warning
 
पाकिस्तानची मागणी होती की तालिबानने अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधात दहशत माजवणाऱ्या संघटनांवर विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)  कठोर कारवाई करावी. मात्र या मुद्द्यावर कोणतेही एकमत न झाल्याने चर्चा तुटली. आसिफ म्हणाले, “मित्र देशांच्या विनंतीवर आम्ही संवादाचा मार्ग स्वीकारला, पण काही अफगाण अधिकाऱ्यांचे विषारी वक्तव्य तालिबान शासनाची विकृत मानसिकता दाखवते.” ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “तालिबान शासनाचा नाश करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये हाकलण्यासाठी पाकिस्तानला आपल्या शस्त्रसाठ्याचा अगदी थोडासा भागही वापरावा लागणार नाही. pakistans-defense-ministers-warning जर त्यांनी युद्धाचा मार्ग स्वीकारला, तर तोरा बोरा येथील २००१ मधील त्यांच्या पराभवाची पुनरावृत्ती जग पाहील.” आसिफ यांनी २००१ मध्ये अमेरिकेने केलेल्या तोरा बोरा मोहिमेचा उल्लेख करत पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचा गौरव केला. त्यांनी तालिबानमधील “युद्धप्रिय घटकांवर” निशाणा साधत म्हटले, “ज्यांचे हित या प्रदेशात अस्थिरता पसरवण्यात आहे, त्यांनी पाकिस्तानच्या निर्धाराची आणि सामर्थ्याची चूक अंदाज बांधू नये.”
 
त्यांनी पुढे चेतावणी दिली, “आम्ही तुमचा विश्वासघात आणि उपहास खूप काळ सहन केला, पण आता पुरे झाले. जर पाकिस्तानमध्ये पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला किंवा आत्मघाती स्फोट झाला, तर त्याचे भयानक परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. आमच्या क्षमतांची परीक्षा घ्या — पण तुमच्या स्वतःच्या विनाशाच्या जोखमीवर.” आसिफ यांनी अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांचे स्मशानभूमी’ म्हटले जाणाऱ्या लोकप्रिय म्हणीवरही टोमणा मारला. pakistans-defense-ministers-warning ते म्हणाले, “पाकिस्तान कधीच स्वतःला साम्राज्य म्हणवत नाही, पण अफगाणिस्तान मात्र स्वतःच्या लोकांसाठीच एक कब्रस्तान ठरला आहे. ते साम्राज्यांचे स्मशान नाही, तर इतिहासातील साम्राज्यांचा खेळाचा मैदान आहे.” दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांतील चर्चेच्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले, “होय, आम्हाला नक्कीच चिंता आहे. आमची एकच अपेक्षा आहे की संवाद थांबला तरी संघर्ष पुन्हा सुरू होऊ नये.” विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या तणावामुळे सीमावर्ती चकमकी आणि अफगाण निर्वासितांच्या हकालपट्टीत वाढ होऊ शकते. पाकिस्तानने आधीच सीमा बंद केली आहे आणि परिस्थिती पूर्ण युद्धाच्या दिशेने जाऊ शकते. त्यामुळे प्रदेशातील स्थैर्यासाठी दोन्ही पक्षांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.