नागपूर,
passengers-suffer-due-to-train-delays दिवाळीदरम्यानच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा करावा लागत आहे. यात प्रामुख्याने नागपूर मार्गे धावणार्या रेल्वेगाड्या विलंबाने धवत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी नागपूरमार्गे जाणार्या तब्बल १५ गाड्या विलंबाने धावत असल्याची नोंद झाली. यात प्रामुख्याने पोरबंदर सुपरफास्ट एक्स्प्रेस तब्बल ४ तास विलंबाने धावली.

फिरोजपूर छावनी-रामेश्वरम हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस, हिसार-तिरुपती विशेष रेल्वे, लालकुआ - विशेष रेल्वे, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, धनबाद-कोयम्बत्तूर विशेष, हावडा- मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल मेल, शालीमार- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस, यशवंतपूर- दिल्ली सराय रौहिल्ला वातानुकूलित दुरंतो एक्स्प्रेस, संतरागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस, कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेस, समरसता सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या नागपूर रेल्वे स्थानकावरून विलंबाने आल्या. passengers-suffer-due-to-train-delays दरम्यानच्या काळात रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना स्थानकावर ताटकळत राहावे लागले. मध्यवर्ती स्थानकावरील प्रतीक्षालय हाऊसफुल्ल झाले आहे.