प्रकाश खाटीक यांच्या सेवानिवृत्तीसोहळ्यात शेकडोंची उपस्थिती

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
दारव्हा, 
दारव्हा तहसीलचे निवासी नायब तहसीलदार Prakash Khatik प्रकाश तुळशीराम खाटीक हे शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या नातेवाईकांनी सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी उत्तरेश्वर मंदिरात त्यांच्यासाठी एक सार्वजनिक सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ आयोजित केला होता. हा निवृत्ती समारंभ लक्षवेधी होता. प्रकाश खाटीक आणि त्यांच्या पत्नी रेखा खाटीक व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचे धाकटे भाऊ, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष खाटीक आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेवक वैशाली खाटीक येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करत होते.
 
 
prakashn
 
या समारंभात शेकडो स्नेही उपस्थित दारव्हा तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार संजय जाधव, दारव्हा नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, कृषी अधिकारी गणेश गिरी, सत्यम बांते, निबंधक राठोड, महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या समारंभाला उपस्थित होते. Prakash Khatik प्रकाश खाटीक १९८९ मध्ये दारव्हा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून रुजू झाले. त्यांनी ३७ वर्षे महसूल विभागात केले. त्यापैकी ३० वर्षे दारव्हा तहसील कार्यालयात सेवा केली. त्यांच्या अत्यंत प्रामाणिक सेवेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट महसूल कर्मचारी, सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणूनही सन्मानित करण्यात आले. 
 
 
 
Prakash Khatik यासोबतच त्यांनी महसूल क्रीडास्पर्धेत यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघाचे नेतृत्व केले आहे. सेवेत असताना त्यांनी अनेक निराधारांना मदत केली. त्यांनी नेहमीच समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर ते निवृत्त होत आहेत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक‘माचे संचालन चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्सचे अध्यक्ष गणेश भोयर यांनी केले. ते म्हणाले, निवृत्ती ही तुमच्या आयुष्यासाठी सॉफ्टवेअर अपडेटसारखी असते. सर्व काही सुरळीत चालते. गणेश खाटीक, वैशाली खाटीक, महेश खाटीक, प्रीती खाटीक, अशोक तितरमारे, वर्षा हे सर्व कुटुंबातील सदस्य या समारंभात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले होते. देवयानी, वैभव, यश, तनय, तन्मय, उदय, आराध्या, अन्वी, श्रेया या बालगोपालांनीही प्रकाश खाटीक यांना शुभेच्छा दिल्या.