पुसद,
येथील नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापक, तसेच पदव्युत्तर अभ्यासकमाच्या माजी विद्यार्थी Prof. Shivani Gawande प्रा. शिवानी रमेश गावंडे यांना पुण्याच्या आंतरराष्ट्रीय नामवंत सिंबायोसिस विद्यापीठात रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन विभागात स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) करण्याकरिता फेलोशिपद्वारे निवड झाली आहे. यासाठी प्रा. शिवानी गावंडे यांना एआय सीटीईच्या डॉक्टरल फेलोशिपमधून सिंबायोसिस विद्यापीठाद्वारा त्यांच्या शोधकार्यासाठी चार मिळून १९ लाख २० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

Prof. Shivani Gawande या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडेंसह सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे. एकाच वर्षी प्रा. शिवानी गावंडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सिंबायोसिस विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ या तीन विद्यापीठांच्या घेण्यात येणार्या चाचणी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत हे विशेष. प्रा. शिवानी गावंडे या देऊरवाडी आर्णी तालुक्यातील लाड या अत्यंत लहान खेड्यातील असून त्यांच्या वडिलांकडे फक्त अडीच एकर कोरडवाहू शेती असल्याने त्यांचे आधीचे शिक्षण वर्धा येथे अत्यंत खडतर परिस्थितीत झाले आहे.